छाणनीनंतर १२ हजार २१२ नामांकन अर्ज ठरले वैध.

Bhairav Diwase
छाननी प्रक्रियेत १७५ नामांकन अर्ज अवैध
Bhairav Diwase. Jan 02, 2021
चंद्रपूर:- जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १२ हजार ३८७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. शु्क्रवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत १७५ नामांकन अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६१ आहे. वरोरा तालुक्यात सर्वाधिक २८ नामांकन अर्ज बाद झाले आहेत.

        ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

    गुरूवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली.

        प्राप्त झालेल्या १२ हजार ३८७ नामांकनापैकी १७५ अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरल्याची माहिती जाहीर करण्यात आली.

      काही उमेदवारांनी दोन नामांकन दाखल केले. त्यामुळे वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. मतदारांना ५ हजार १५१ सदस्यांना निवडून द्यायचे आहे.

 ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रांची त्रुटी भोवली....

यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकीकृत ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कागदपत्र जोडणे बंधनकारक होते. मात्र, माहिती आणि वेळेचा अभाव या दोन कारणांमुळे नामांकन अर्जात त्रुटी राहिल्या. त्यामुळे १७५ नामांकन अर्ज आजच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले.

४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार......

१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल, माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी दिली. ४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. ग्रामीण भागातील चावडीवर राजकीय घडामोडींबाबत चर्चेला ऊत आला आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत गावागावात विविध घडामोडींना वेग येणार आहे.