सिंदेवाही तालुका पुरोगामी पत्रकार संघाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सर्व धर्म समभाव या संकल्पनेतून पुरोगामी पत्रकार संघाद्वारे सर्व पुरोगामी महापूरूषांच्या जयंतीतीचा व पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्याचे मागील मिटिंमध्ये ठरविल्यानूसार दिनांक ०३/०१/२०२१ रोजी " क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीचा कार्यक्रम जनसेवा सेलिब्रेशन हॉल", जाटलापूर रोड सिंदेवाही येथे दुपारी १२-३० वाजता साजरा करण्याचे ठरलेले आहे.
  जयंती कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मा. रुपेशजी निमसरकार, सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे साहेब, पोलिस उप-निरीक्षक सुशिलकुमार सोनवाने साहेब, पोलिस उप-निरीक्षक गोपिचंद नेरकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत. तरी पुरोगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यानी सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष- भगवंत पोपटे यांनी केले आहे.