गडचांदूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदगाव सूर्या येथील शंकर कोपरे वय 40 यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या शेतात आढळून आला. शंकर फोफरे हे आपल्या शेतात गेले असताना वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्या गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करत निग्रह हत्या करण्यात आली.
काल दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगा शेतात गेले असताना त्यांच्या मृत शरीर रक्ताने माखलेल्या स्थितीत दिसताक्षणी आरडाओरड करत गडचांदूर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानुसार गडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर चे ठाणेदार गोपाळ भारती यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवित, पुढील तपास करीत आहेत.