Top News

घुग्गुस येथे मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे आयोजन.

Bhairav Diwase. Jan 19, 2021
चंद्रपूर:- घुग्गुस येथील प्रयास सभागृहात मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी व रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आज मंगळवारला दिनांक 19/1/2021 रोजी दुपारी घुग्गुस येथील प्रयास सभागृहात पार पडली.

यावेळी घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ.किरणताई बोढे यांनी उपास्थित महिलांना होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली व मार्गदर्शन केले आणि होणाऱ्या मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनात महिलांनी मोठया संख्येत उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.

नियोजनाच्या बैठकीत मुख्य मार्गदर्शिका प्रयास सखी मंच घुग्गुस सौ. अर्चनाताई भोंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई सातपुते, सुचिता लुटे, वैशाली ढवस,वसुधा भोंगळे, शारदा गोडसेलवार, नजमा कुरेशी, कीर्ती पडवेकर, सारिका भोंगळे, लक्ष्मी पतंगे, सुनीता पाटील, चंद्रकला मन्ने,पुष्पा रामटेके, नर्मदा वाघमारे, सपना वासेकर,निशा राम, अर्चना पोईणकर, पौर्णिमा पुसाटे, सरस्वती राणा, कविता झाडे, हलिमा शेख, सहिस्ता परवीन, अमना राईन, गुलशन बानो, आरिफा खान व मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.

घुग्गुस येथे मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे उदघाटक मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन व वनमंत्री तथा अध्यक्ष विधी मंडळ लोक लेखा समिती महाराष्ट्र राज्य, विशेष अतिथी देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष चंद्रपूर, सौ. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष जिल्हापरिषद चंद्रपूर, वनिताताई कानडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र, कु. अल्काताई आत्राम अध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, सौ. नितुताई चौधरी माजी जिप महिला व बालकल्याण सभापती चंद्रपूर, श्री.विवेक बोढे भाजपा युवमोर्चा जिल्हामंत्री चंद्रपूर, प्रमुख अतिथी माजी उपसभापती पंस चंद्रपूर निरीक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने घुग्गुस, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार घुग्गुस, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, साजन गोहणे,सिनू इसरप, प्रकाश बोबडे, विनोद चौधरी जिल्हा उपाध्यक्ष वाहतूक आघाडी चंद्रपूर, पूनम शंकर माजी सदस्य, हसन शेख तंमूस अध्यक्ष घुग्गुस म्हणून उपस्थित राहणार आहे.

शनिवार दिनांक 23/1/2021 रोजी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत प्रथम दिवशी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

1) रांगोळी स्पर्धा- प्रथम पुरस्कार 1,500 रुपये. 2) द्वितीय पुरस्कार 1,000 रुपये. 3) तृतीय पुरस्कार 500 रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

2) निंबू चम्मच स्पर्धा- प्रथम पुरस्कार 1,500 रुपये 2) द्वितीय पुरस्कार 1,000 रुपये 3) तृतीय पुरस्कार 500 रुपये ठेवण्यात आले आहे.

3) बोरा रेस स्पर्धा- प्रथम पुरस्कार 1,500 रुपये 2) द्वितीय पुरस्कार 1,000 रुपये 3) तृतीय पुरस्कार 500 रुपये ठेवण्यात आले आहे.

4) रस्सी खेच स्पर्धा- प्रथम पुरस्कार 2,000 रुपये 2) द्वितीय पुरस्कार 1,500 रुपये 3) तृतीय पुरस्कार 1,000 रुपये ठेवण्यात आले आहे.

5) संगीत खुर्ची स्पर्धा- प्रथम पुरस्कार 1,500 रुपये 2) द्वितीय पुरस्कार 1,000 रुपये 3) तृतीय पुरस्कार 500 रुपये ठेवण्यात आला आहे.




रविवारला दिनांक 24/1/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता द्वितीय दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1) एकल नृत्य- प्रथम पारितोषिक 3,000 रुपये व शिल्ड 2) द्वितीय पारितोषिक 2,000 रुपये व शिल्ड 3) तृतीय पारितोषिक 1,000 रुपये व शिल्ड ठेवण्यात आले आहे.

2) समूह नृत्य- प्रथम पारितोषिक 4,000 रुपये व शिल्ड 2) द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये व शिल्ड 3) तृतीय पारितोषिक 2,000 रुपये व शिल्ड ठेवण्यात आले आहे.

3) फॅन्सी ड्रेस- प्रथम पारितोषिक 1,500 रुपये व शिल्ड 2) द्वितीय पारितोषिक 1,000 रुपये व शिल्ड 3) तृतीय पारितोषिक 500 रुपये व शिल्ड ठेवण्यात आले आहे.
तसेच "हळदी कुंकू, वाण वाटप" तथा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन- भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्गुसच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने