चिमूर:- चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब आहेत.सतत गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे आमदार साहेब यांनी जनतेची सेवा करतांना "जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा" समजून कार्य करीत आहेत. गरीब बहिणीच्या लग्नाला लागणारी आर्थिक मदत,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते मार्फत नेहमी करीत आहेत.
चिमुर विधानसभा क्षेत्रात गरिब जनतेला होणाऱ्या आरोग्य विषयक बाबींचा विचार करून डॉक्टर आपल्या दारी अश्या उपाययोजना राबवून निस्वार्थ पणे सेवा देत आहेत. 2018 पासून जन्माला येणाऱ्या प्रथम कन्येला आपली बहीण समजून भविष्यात तिच्या लग्नाची मदती करिता 40,003 रुपयांचे फिक्स रोखे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मार्फत वाटप करीत आहेत.
ह्याच सेवा कार्याची परतफेड म्हणून नागभीड तालुक्यातील 43 ग्रामपंचायत पैकी 24 ग्रामपंचायत मधील जनतेनी मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवून आमदार साहेबांचे मार्गदर्शनात नागभीड तालुक्यात उभे असलेल्या भाजपा उमेदवारांचा कोणताही विरोध न करता त्यांना भरघोस मताने विजयी करून भाजपाला बहुमत प्राप्त करून जनतेने भाजपाला पुन्हा एकदा कौल दिलेला आहे.
परंतु काही विरोधक ह्याच बहुमताचा फायदा घेत असून आपलं नावं समोर करून हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ते विसरले की जनतेच्या मनात सदैव मा.आमदार साहेब व भाजपा पक्षासाठी सतत काम करीत गरीब जनतेच्या अडचणी दूर करणारे खरे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.