Top News

आजपासून लोकमान्य विद्यालयात व्याख्यानमाला.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- लोकसेवा मंडळ भद्रावती चे आद्य संस्थापक कै. निळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या जयंती समारोह निमित्त लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे 20 व 21 जानेवारीला दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

             20 जानेवारी रोज बुधवार ला सकाळी साडेनऊ वाजता व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसेवा मंडळ भद्रावती चे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून आमदार बल्लारशा निर्वाचन क्षेत्र सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रांत महामंत्री विदर्भ विश्व हिंदू परिषद विदर्भाचे गोविंद शेंडे नागपूर हे उपस्थित राहणार असून व्याख्यानाचा विषय राम मंदिर ते राष्ट्र मंदिर असा आहे. प्रमुख अतिथी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, पोलिस निरीक्षक सुनील सिंह पवार, माजी अध्यक्ष लोकसेवा मंडळ भद्रावती बळवंत दादा गुंडावार, सचिव मनोहरराव पारधे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्कर वार हे उपस्थित राहणार आहे.

                 21 जानेवारी रोज गुरूवार ला सकाळी साडेनऊ वाजता व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले जाणार असून प्रमुख अतिथी म्हणून वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर तर प्रमुख वक्ते म्हणून आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी ,गुरुकुंज आश्रम मोझरी हे उपस्थित राहणार आहे. व्याख्यानाचा विषय राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म हा असणार आहे .प्रमुख उपस्थिती म्हणून संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, मुख्याधिकारी नगर परिषद भद्रवती सूर्यकांत पिदुरकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्राचार्य पांडुरंग बतकी, उपप्राचार्य प्राध्यापक सुरेश परसावर, पर्यवेक्षक बंडू दरेकर हे उपस्थित राहणार आहे. व्याख्यानमालेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने