ढोरवासा केंद्रप्रमुखाकडून सावित्रीच्या लेकींचा सत्कार.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील प्रयोगशील केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांच्या कल्पनेतून नुकतेच ढोरवासा केंद्रातील महिला मुख्याध्यापिकांचा सावित्री बाई फुले जयंती निमित्त सत्कार करण्यात आला.

            आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे केंद्राला नेहमीच अव्वल ठेवणारे श्री गायकवाड साहेब यांनी यावेळी पण सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून केंद्रातील मुख्याध्यापिकांचा सत्कार केला.

           गटशिक्षणाधिकारी श्री धनपालजी फटींग साहेब यांच्या प्रेरणेने व श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनात या ढोरवासा केंद्राने स्वाध्याय, फिट इंडिया,गोष्टीचा शनिवार,महाकरियर पोर्टल मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.गायकवाड साहेब झूम,गूगल मीटिंग द्वारे सर्व मुख्याध्यापकांशी समन्वय साधून असतात. कोरोना काळात स्ववयंसेवक,शिक्षक,शिक्षण प्रेमी तसेच गावातील शिक्षित व्यक्ती यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवून आहेत.

           ऑफलाईन, ऑनलाइन माध्यमातून केंद्राचे शैक्षणिक कार्य जोमात सुरू आहे, केंद्रात एकूण 11 जिल्हा परिषद व 2 माध्यमिक शाळा आहेत या 13 पैकी 5 शाळेत महिला मुख्याध्यापिका कार्य सांभाळत आहेत. महिला असून सुद्धा तोच उत्साह कायम ठेवून या महिला ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत. म्हणून सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून केंद्रातील महिला मुख्याध्यापिकांचा नुकताच श्री गायकवाड साहेब केंद्रप्रमुख ढोरवासा यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.