(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील हनुमान नगर पांडव वार्ड येथे भिम आर्मी भारत एकता मिशन ची वार्ड शाखा पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली.
शाखा प्रमुख मोरेश्वर कांबळे ,उपाध्यक्ष विक्की चंडाले, महासाचिव प्रणालीताई मेश्राम, सहसचिव बेबीताई निमगडे, संघटक विमल ताई कांबळे, सदस्य जोत्स्ना अतकर, रेखा रॉय, रंजना रायपूरे, रुपाली चट्टे, सपना बावणे, मुन्नी खान, अहिंसक गुप्ता, रोहित रॉय, प्रेशिक पेटकर, अनिल पाटील, यादव निमकर, बंडू रायपुरे, दिनकर बावणे यावेळी वार्डातील अनेक युवकांनी व नागरिकांनी भिम आर्मीत प्रवेश केला. नवनियुक्त पदाधिकारी तथा सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. प्रथम भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख शंकर मुन व तालुका प्रमुख अनवर शेख यांच्या नेतृत्वात एक बैठक घेण्यात आली.त्यात सदर नवनियुक्त कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी दासू मानकर, सतीश नगराळे, प्रणय दारव्हेकर, विजय श्रीवास, नितीन देवगडे, रतन पेटकर, आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते शाखा गठीत करतांना उपस्थित होते.