सावली:- शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्यावी या मुद्द्यांना घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात सावलीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात मोर्चा काढण्यात आला.
केंद्र सरकारने नविन शेतकरी कायदे पास केले आहे ते रद्द व्हावे यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी व पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे म्हणून दर कमी करावे या मागण्या घेऊन काँग्रेसच्या वतीने सावलीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात गॅस दरवाढी विरोधात महिलांनी चुली पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला, शेतकऱ्यांकडून शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सहकारी बँकेचे संचालक संदीप गडमवार, खनिज विकास समिती सदस्य दिनेश चिटनूरवार, माजी आमदार देवराव भांडेकर, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तालुकाध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला अध्यक्ष उषा भोयर, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, माजी अध्यक्ष राजेश सिद्धम, प्रकाश राईनचवार, युवा अध्यक्ष नितीन दुवावार, जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेरकी, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, रजनी भडके, गुणवन्त सुरमवार, नीलिमा सुरमवार, मनीषा जवादे,उर्मिला तरारे, संगीता चौधरी, संदीप पुण्यपवार, भोगेश्वर मोहूर्ले आदींसह हजारो मोर्चेकरी सहभागी होते. मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार सागर कांबळे यांचेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.