चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षापासून कोरपना तालुक्यातील भारोसा ग्रामपंचायती अंतर्गत ईरई हे किमान 500 लोकांची वस्ती असलेले गाव बऱ्याच सुविधांपासून दुर्लक्षित आहे. नुकताच इरई येथील तरुणांच्या माध्यमातून युवा स्वाभिमान पार्टी ची शाखा जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.
त्यावेळी तेथील नागरिकांनी सुरज ठाकरे यांना आपल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखविला एकेक करून सर्व समस्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न करतो असे वचन युवा स्वाभिमानचे सुरज ठाकरे यांनी गावकऱ्यांना दिले व त्याचीच एक सुरुवात म्हणून आज सूरज ठाकरे यांच्या मार्गदर्शना मध्ये युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरचे जिल्हा कार्यकारणी सदस्य व कार्यालय प्रमुख श्री. राहुल चव्हाण, व इरई येथील सरकल अध्यक्ष निखिल पिदूरकर, शाखा अध्यक्ष बाळकृष्ण भोयर, शाखा उपाध्यक्ष प्रथम तेलंग, धनराज भगत आदी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आज चंद्रपूर जिल्हा बस सेवेचे मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत इरई गावामध्ये आजपासून बस सेवा सुरू केली. त्यामुळे ईरई येथील गावकऱ्यांनी एस टी महामंडळ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन आभार वेक्त केले. युवा स्वाभिमान पार्टी च्या या यशानंतर गावातील इतरही समस्यांचे निवारण नक्कीच करू असे वचन मा. जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी गावकर्यांना दिले.
व एस टी महामंडळ, चंद्रपूर चे युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आभार देखील वेक्त केले.