Top News

चंद्रपूर जिल्हयातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर अंकुश घालण्यासाठी पोलीस विभागाचे विशेष पथक तयार करावे.

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना सुचना.
Bhairav Diwase.    Feb 02, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा हा शांतप्रीय जिल्हा अशी ओळख असतांना मागील काही वर्षांमध्ये जिल्हयात गुन्हेगारीत व अवैध धंद्यांमध्ये झालेल्या अफाट वाढीमुळे या शांत जिल्हयाची प्रतिमा मलीन होत असून जिल्हयातील सामान्य नागरिक हा दहशतीच्या वातावरणात जिवन जगत आहे. जिल्हयात हत्याकांड, अवैध दारू तस्करी, रेती तस्करी सर्रास सुरू असतांना गुन्हेगारीत वाढ होत आहे. या गुन्हेगारीवर आळा घालूण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस विभागाचे विशेष पथक तयार करण्यात यावे अशा सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांना केल्या.

याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. संजय धोटे, भाजपाचे जेष्ठ नेते अरूण मस्की, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, राजुरा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, गौतम यादव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.  
  नुकताच राजुरा येथे राजु यादव या कोळसा वाहतुकदाराची गोळया घालुन निर्घुण हत्या करण्यात आली. काही महिण्यांपूर्वी सुरज बहुरीया नामक व्यक्तिवर गोळया घालुन हत्या करण्यात आली. मनोज अधिकारी यांची हत्या झाली अशा दुर्देवी घटना सलग घडत असतांना यांची चैकशी होवून गुन्हेगारांना कडक शिक्षा होणे हे अपेक्षित असतांनाच अशा घटना घडू नये यासाठी सुध्दा उपाययोजना करणे गरजेेचे आहे असेही यावेळी अहीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना सांगीतले. 

जिल्हयातील माजरी, नांदा फाटा, बल्लारशा, राजुरा - सास्ती, दुर्गापूर या ठिकाणी बाहेर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी  गुन्हेगारीचा हैदोस घातला आहे असे चित्र असतांना जिल्हयात होत असलेल्या गुन्हेगारीचा उगम शोधणे हाच पोलीस विभाग व समाजात कार्य करणा-यांसाठी आवाहन आहे. या ठिकाणी पोली बंदोबस्त वाढविण्याची कार्यवाही जलद गतीने व्हावी असेही यावेळी अहीर यांनी सांगीतले. राजुरा येथे घडलेला हत्याकांडाच्या माध्यमातून देशी कट्टा वापरण्यात आला असतांना हे शस्त्र गुन्हेगारांकडे आले कुठून याची प्राथमिकतेने चैकशी होणे गरजेचे आहे ज्यामुळे अन्य काही समाजकंटकांकडे शस्त्र पोहचले असेल तर त्याची माहिती पोलीस विभागाला मिळेल व ज्यातून भविष्यात होणा-या दुर्देवी घटनांवर अंकुश लावता येईल असेही यावेळी अहीर यांनी पोलीस अधिक्षकांना सुचविले.  
जिल्हयात दारूबंदी असतांनाही जिल्हयात अवैध दारूचे प्रमाण वाढत आहे. या अवैध दारूचा पुरवठा कोणत्या ठिकाणाहून होत आहे, त्या पुरवठयामागे कोण आहे याचा शोध घेवून संबंधित पुरवठा करणा-या दुकानदारांचा परवाना थेट रद्द करण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घ्यावा असे मत यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. 
यावेळी माजी आमदार अॅड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात  वाढलेली गुन्हेगारी व नागरिकांमधील दहशतीबद्दल खंत व्यक्त केली. त्यांनी राजु यादव हत्याकांड, गोंडपिपरी येथील मुलीवर बलात्कार, जिवती येथील मुलीवर झालेला अत्याचार, नांदा फाटा येथील गुन्हेगारींवर विशेष प्रकाश टाकून विधानसभा क्षेत्रात पोलीस यंत्रणा अधिक मजबुत करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती जिल्हा पोलीस अधिक्षक यांना केली.
जिल्हयातील वाढलेल्या गुन्हेगारीवर अंकुश घालण्यासाठी पोलीस विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना  करण्यायाचा विश्वास यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व माजी आमदार अॅड. संजय धोटे यांच्याकडे व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने