Top News

सरपंच आरक्षण बदलासाठी चुनाळावासीय धडकले तहसिलवर....

बाळनाथ वडस्करांच्या पाठीशी संपूर्ण चुनाळा; महिलांनी नाकारले सरपंच पद.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- कोरोना टाळेबंदीनंतर सप्टेंबर महिन्यांत कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक नुकत्याच पार पडला असून सरपंच पदाचे आरक्षण (दि.२९) जाहीर झाले. मात्र चुनाळा ग्रामपंचायत येथील सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव निघाल्याने चुनाळा वासीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेल्याने संपूर्ण चुनाळा वासीयांनी राजुरा तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देत सरपंच पदाचे आरक्षण बद्दलविण्याची मागणी केली आहे.
      
    तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चुनाळा (मा.) येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या तेरा असून यात संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर या सात महिला राखीव जागेवर निवडून आल्या आहे. नुकतेच (दि. २९) सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली असून यात चुनाळा ग्राम पंचायतीकरिता सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गातून आरक्षण निघाले या अगोदर १९९५ ते १९९९ व त्यानंतर अनुसूचित महिला करीता राखीव २०१० ते २०१५ व आताही महिलांकरिता राखीव सरपंच पदाचे आरक्षण निघाल्याने गावात अरक्षणासंबंधी रोष निर्माण झाला असून हे आरक्षण रद्द करण्यासंबंधी नवनियुक्त सदस्य व गाववासीयांनी मोर्चा काढत तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देऊन आरक्षण बद्दलविण्याची मागणी केली आहे.
     
      ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांसह सर्वसामान्य  नागरिकांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची धुरा सांभाळलेले माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बाळनाथ वडस्कर यांना इतर तेरा सदस्यांना निवडून दिले. यात सात महिला सदस्य असताना त्यांना सुद्धा सरपंच पदी बाळनाथ वडस्कर हेच हवे असल्याने व सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस गावाचा कारभारी व्हावा हि सर्व चुनाळावासीयांची इच्छा आहे. तेव्हा प्रशासनाने आरक्षणात बदल करून सर्वसाधारण पुरुष देण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने