Top News

वेकोली प्रशासनाकडून मागण्या मान्य झाल्याने उपोषणाची सांगता.

कुचना महाप्रबंधक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती : वेकोली प्रशासनाकडून अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या अंशता मान्य झाल्याचे युवा सेनेचे माजरी शहर प्रमुख सरताज सिद्धीकी यांच्या हस्ते उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना निंबुपाणी देऊन त्यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
        सौ.राखी राजकुमार ठाकरे, सौ.निता विनोद सोमलकर, रूपम रवींद्र धोटे, व शुभम रमेश डांगे या चार शेतकऱ्यांनी वेकोली मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. त्यांनी त्यांच्या शेतात वेकोलीने टाकलेली माती उचलून शेती वाहण्यासाठी योग्य करून द्यावी. गावालगतच्या जुन्या पांदण रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधून द्यावा. पळसगाव शिवेवर पक्का रस्ता बनवावा. २०१५ पासूनची शेतीची नुकसानभरपाई द्यावी. चारही शेतकऱ्यांची शेती संपादित करून त्यांना नौकरीत सामावून घ्यावे. व उपोषणकर्ते शेतकऱ्यांच्या वडिलांची हेतुपुरस्परपणे केलेली बदली रद्द करावी या मागण्या वेकोली प्रशासनासमोर ठेऊन आमरण उपोषणाला सुरवात केली होती.
       यातील मागण्या मान्य करून उर्वरित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण सोडण्यात आले. या शेतकऱ्यांच्या उपोषणाला शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे शिवसैनिक लेडांगे ताई व मांजरी शहर प्रमुख सरताज सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनात युवासेनेने सदर उपोषणाला पाठींबा दिला होता. यावेळी वेकोली कर्मचारी व माजरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने