Top News

कापलेले विज कनेक्शन दोन दिवसात जोडा अन्यथा घेराव आंदोलन.

वंचित बहुजन आघाडीचे विज वितरण कंपनीला निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील ज्या विज ग्राहकांची कनेक्शन भरले नाही म्हणून तोडले आहे. त्यांचे विद्युत कनेक्शन दोन दिवसात जोडा व थगीत बिलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना सुलभ हप्ते पाडून द्या अन्यथा घेराव आंदोलन करण्यात येईल असा ईशारा येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील विज वितरण कंपनीला एका निवेदनातून देण्यात आला आहे.
        विज वितरण कंपनीतर्फे भद्रावती शहरातील अनेक पडीत बिले असलेल्या ग्राहकांचे विज कनेक्शन कापण्यात आले आहे. ग्राहक टप्याटप्याने विज बिल भरण्यासाठी तयार आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विज ग्राहकांना सवलत हवी आहे. मात्र विज वितरण कंपनी ग्राहकांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी विज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला आहे. या मोहिमेमुळे सर्वसामान्य व गोरगरीब ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करावे विज बिलावरील लावण्यात आलेले अतिरिक्त कर रद्द करावे. परिक्षेचा कालावधी असल्यामुळे ग्राहकांचे विज कनेक्शन तोडू नये व थगीत विज बिलाचे सुलभ हप्ते पाडून ग्राहकांना विज बिल भरण्यास सुविधा द्यावी. या मागण्या मान्य न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही वंचित बहुजन आघाडीतर्फे विज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास देण्यात आला आहे.
            यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, तालुका अध्यक्ष विजय इंगोले, सुशील देवगडे, सुनील खोब्रागडे, राखीताई रामटेके, सीमाताई ढेंगळे, राहुल चौधरी, व अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने