Top News

12 वर्षाची मुलगी बुडाली वर्धा नदीत.

दुपारी तीन वाजताच्या सुमारास घटना; पोलीसांकडून शोधकार्य सुरू.
Bhairav Diwase.       March 16, 2021
चंद्रपूर:-  16 मार्च 2021 दुपारी तीन मैत्रिणी दोन वाजताच्या सुमारास नदी काठी पायदळ फिरायला गेले होते. बल्लारपूर तालुक्यातील संजना गजानन धुर्वे वय(21)रा, साईबाबा वॉर्ड, रविना आत्राम (20)रा, श्रीराम वार्ड व अक्षरा बबन सोनटक्के वय(12) यांनी तिथे सोबत नेलेली पेस्ट्री केक खाल्ले व रविना आत्राम, अक्षरा सोनटक्के हे दोघेही पेस्ट्री खाल्लेले हात धुण्यासाठी नदी काठी गेले असता अक्षरा चा पाय घसरला व ती पाण्यात बुडाली. #adharnewsnetwork हि घटना तीन वाजता चा दरम्यान घडली. अशी माहिती पोलिस स्टेशन ला रविना आत्राम व संजना धुर्वे यांनी दिली, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा शोधकार्य सुरू आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने