Top News

कोविड-19 टेस्ट रिपोर्ट 24 तासाच्या आत मिळावी तसेच ग्रामीण भागात मोबाईल व्हॅनव्दारे चाचणी केंद्र फिरावे:- राहुल संतोषवार सदस्य जि. प. चंद्रपुर.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांची कोरोना टेस्ट केल्या नंतर कोरोना टेस्ट रिपोर्ट 3 ते 4 दिवसांनी मिळत असल्यामुळे तपासणी केलेले संभावीत पॉझिटिव्ह रुग्ण हे 3 ते 4 दिवस बाहेर फिरत राहिल्यास इतर लोकांना त्याचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकते.

कोरोना टेस्ट रिपोर्ट यायला विलंब न होता 24 तासाच्या आत रिपोर्ट मिळणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण क्षेत्रात मोबाईल व्हॅनव्दारे कोविड चाचणी केंद्र फिरविण्यात यावे. त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांना येणे-जाणे करण्याकरीता लागणाऱ्या गाड्यांची व्यवस्था कोणत्याही स्तरांवर उपलब्ध नसल्यामुळे सब सेंटरला कोविड 19 ची चाचणी केंद्र देण्यात यावे. अशी मागणी राहुल संतोषवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना पत्रव्यवहार करून केली. तसेच शासन स्तरावर जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी पडल्यामुळे शासनास कळवून लवकरच ग्रामीण भागात जनजागृती करीता भर देण्यात यावे. अशी विनंती राहुल भाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना केली. तसे विनंती चे पत्र आ. मुनगंटीवार यांना देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने