चंद्रपूर:- गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 9 येथील मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्रासोबत छेडछाड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत सुरू केले. विशेष म्हणजे यावेळी कंट्रोल युनीट पुर्णपणे सुरक्षित होते.
विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी असून आज गडचंदुर येथील मतदान केंद्र क्रमांक 9/2 येथे मतदान करताना त्याने बॅलेट युनिट ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर उपस्थित पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने सदर मतदान केंद्रावर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले आहे.

