दिलीप वळसे पाटील होणार राज्याचे नवे गृहमंत्री!

Bhairav Diwase
Bhairav Diwase.        April 05, 2021
मुंबई:- राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नव्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दलचे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.