पोंभुर्णा:- संपूर्ण देशाची, विशेषतः महाराष्ट्राची परिस्थिती covid-१९ मुळे अतिशय बिकट आणि चिंताजनक झालेली आहे. आपल्याला सर्वांना आरोग्य विषयक नियमांचे कठोर पालन करणे भाग आहे.
45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन पोंभुर्णा प्रशासन कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला पोंभुर्णा शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण करण्यासाठी पोंभुर्णा शहर नागरिकांनी दि. 05/04/2021 ला ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वार्ड. क्रमांक ११ ह्या ठिकानी) आणि पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकानी नवीन ग्रामीण रूग्णालयात येथे (चितांमणी कालेज समोर) कोरोनाची लस ताबडतोब टोचून घ्यावी. स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, संपूर्ण देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी योगदान द्यावे. येताना सोबत आधारकार्ड किंवा मतदान ओळखपञ अवश्य आणावे. असे आवाहन पोंभुर्णा प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा. पोंभुर्णा शहर तसेच ग्रामीण भागातील नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.