Top News

अज्ञात इसमाने शेतात लावलेल्या आगीत गहू, तणसाचे ढिगारे व मोटारपंप पाईप जळून खाक.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- नेरी वरून जवळ असलेल्या सावरगाव येथे आज सकाळी 11 वाजता कुणी अज्ञात इसमाने शेतात वणवा लावला असता वाऱ्याच्या झुळकीने आग पूर्ण शेती परीसरात अंदाजे 50ते 60एकर जागेत पसरली आणि यात तनसाचे 9 ढग शेतात पेरलेले उभे असलेले गहू विरीवरील मोटार पंप चे पाईप जळुन खाक झाले आग इतकी भयंकर होती की शेतकरी विजवण्यासाठी धावले परन्तु आग आटोक्यात आली नाही शेवटी भ्रमणध्वनी वरून राजेंद्र शेदरे यांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आली  यात खूप मोठे नुकसान झाले


         सदर असे की  हेटी जवळील शेती  परिसरातील कुणीतरी अज्ञात इसमाने शेतात गवत काडीकचरा पटविण्यासाठी आग लावली. आगीने वाऱ्याच्या झुळकीने रौद्ररूप धारण करीत सावरगाव शेती परिसरापर्यंत संपुर्ण शेतीचा बराच परिसर कवेत घेतला त्यामुळे शेतात आगीचा धूर दिसताच गावातील शेतकरी आग विजवण्यासाठी शेतात धावले आगीने बराच मोटा परिसर जाळून खाक केला होता यात राजेंद्र शेंदरे यांचे तनस विहिरीवरील मोटार पंप 5 पाईप आणि सेक्सशन पाईप जळुन खाक झाले तर प्रवीण शेदरे यांचे 25 पाईप व शेतात उभे असलेले गहू जळुन खाक झाले लागूनच बाजूच्या शेतकऱ्याने आग पाहताच गहू कापणी  सुरू केली त्यामुळे थोडक्यात मोठी नुकसान टळली जर नेरी सावरगाव रस्ता नसता तर रस्त्याच्या बाजूच्या शेतशिवर जळुन खाक झाला असता व मोठी हानी झाली असती  यामध्ये तीन तनसाचे मोठी ढिगारे जळुन भस्म झाली आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यामुळे आग आटोक्यात आली घटनेची माहिती प्रशासनाला होताच महसूल मंडळाचे तलाठी श्री मेहरकूरे यांनी घटनास्थळी रवाना होत नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा केला  सदर आगीत खूप मोठे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दयावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने