नाशिक:- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रवीण धायगुडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिकत होता, अशी माहिती आहे.
🎂
प्रवीण नेहमीप्रमाणे घरी व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
🎂
नाशिकच्या चांदवडमध्ये एका मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रवीण धायगुडे (वय वर्ष 15) असे मृत मुलाचे नाव असून, तो इयत्ता दहावीत शिकत होता. नेहमीप्रमाणे तो घरी व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला. जोरात आवाज आल्याने, काय झालं म्हणून आईने धाव घेतली. तेव्हा त्यांना प्रविण कोसळलेला दिसला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. डॉक्टरांनी प्रवीणला तपासून मृत घोषित केले.
प्रवीणच्या मृत्यूने धायगुडे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.