Click Here...👇👇👇

Suicide News : महाविद्यालयीन प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास

Bhairav Diwase

वर्धा:- एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसरीकडे आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी आपल्या लेकीचा बारावीला प्रवेश न घेतल्यानं विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावातली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोनिया वासुदेव उईके (वय १७) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे आपल्या पत्नी, मुलगा आणी मुलगी सोबत राहतात. वासुदेव हे शेतमजूरीचं काम करून आपली उपजीविका चालवतात. तर त्यांचा मुलगासुद्धा बाहेर कामावर जातो. वासुदेव यांची १७ वर्षीय मुलगी सोनिया ही वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती. ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती. सोनियाचे अकरावीचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्यानं ती घरी आली होती. सोबतच सणवारला सुद्धा ती घरी यायची. एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्यानं ती घरीच होती. यावर्षी ती बारावीत गेल्यानं आणि शाळा सुरु झाल्यानं वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती. वडील आर्थिक अडचणीत असल्याने ते 'तू काही दिवस होस्टेलमध्ये राहा, पैशांची व्यवस्था करून प्रवेश घेऊन देतो' असं सांगत होते. मात्र, अशातच आई, वडील आणि भाऊ कामावर गेल्यानं घरी कोणीच नसल्यालं तिने पैशांअभावी आणि १२वीला प्रवेश न झाल्यानं हताश होऊन घरातील बाथरूमच्या अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचं दार त्यांना उघडं दिसलं. वडिलांनी पाहणी केली असता घरात कोणी दिसलं नाही. तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणि घरातील मधलं दार लावलं असल्याचं पाहिलं. मुलाने घराच्या मागील बाजूनं जाऊन पाहिलं असता बाथरूममध्ये त्याची बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुलगाव पोलीस तपास करत आहे.