Click Here...👇👇👇

कोविड 19 वरील उपचार निःशुल्क करण्यात यावे- आसिफ सय्यद

Bhairav Diwase
आरोग्य मंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- या लॉकडाऊन च्या कालावधीत संपूर्ण देशाची तथा राज्याची आर्थिक परिस्थिती ठप्प झाली आहे. या बिकट परिस्थितीचा सर्वात जास्त आर्थिक ताण सामान्य व गरीब जनतेला पडला आहे. आजच्या स्थितीत गरीब व सामान्य जनता दोन वेळचे अन्नासाठी धावपळ करीत आहे.
अशातच राज्यात कोविड 19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व यामध्ये उपचाराच्या नावाखाली प्रचंड लुटमार सुरू असल्याचे दिसून येत आहे. तथा जनतेची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे अनेक रुग्णांचे उपचारा अभावी मृत्यू होत असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगावे की मरावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.


यामुळे राजुरा राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार श्री. राजेश टोपे यांना ई मेल द्वारे निवेदन पाठऊन कोविड 19 वरील उपचार निःशुल्क करण्यात यावे अशी मागणी केली आहे.