जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

आरोग्य वर्धिनी उपकेंद्र चुनाळा येथे 45 वर्षे च्या वरील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज गुरुवार दि. 06/05/2021 रोजी 11.00 वा. प्रा.आ. उपकेंद्र चिंचोली बु. अंतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र चुनाळा येथे 45 वर्षे च्या वरील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ राजुरा चे तहसीलदार श्री हरीश गाडे यांच्या हस्ते व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी चुनाळा ग्रा.पं.चे सरपंच बाळू वडस्कर, डॉ.अक्षय बुरलावार, डॉ.स्नेहा गिरडकर, उपकेंद्राच्या ए.एन.एम.चांदेकर मॅडम, ए.एन.एम.कोंडावार मॅडम, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते.

फक्त 100 डोज लस उपलब्ध झाल्यामुळे बऱ्याच नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले. या उपकेंद्रा मध्ये चुनाळा व बामनवाडा ह्या दोन मोठया गावांचा समावेश असून लोकसंख्या 6000 च्या वर असल्यामुळे या केंद्रावर लसीचे जास्त डोज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. पुढच्या लसीकरणाच्या वेळी प्रथम प्राधान्य चुनाळा व बामनवाडा येथील नागरिकांना देण्याची मागणी करण्यात आली. या केंद्रावर लसीचा दुसरा डोज देण्याचे प्रावधान नसल्यामुळे तहसीलदार गाडे यांना दुसरा डोज घेता आला नाही. अश्या अनेक बाहेरून आलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोज अभावी आल्या पावली परत जावे लागले.या उपकेंद्रात लसीकरण सुरु झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यापुढे लसीचे नियमित कमीत कमी दोनशे डोज उपलब्ध करण्याची मागणी कर्तव्यदक्ष सरपंच बाळू वडस्कर यांनी केली.

चुनाळा येथील या उपकेंद्रात लसीकरण सुरु करण्या करता बाळू वडस्कर यांनी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. या लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना सद्यस्थितीत लसीकरण नसल्याची माहिती याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत