जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

युवा पोलीस कर्मचाऱ्यांने विस कुटुंबिंयाना दिला मदतीचा हात.

पत्नीच्या प्रोत्साहनाने अनिल चव्हाण यांनी जोपासले सामाजिक दायित्व.
Bhairav Diwase.     May 06, 2021
गोंडपिपरी:- कोरोनाच्या संकटान सारच थांबल. यामुळे रोजीरोटी करणाऱ्यांचे अक्षरश खाण्यापिण्याचे वांदे होत आहेत. मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटात अनेकांनी अनेकांना मदतीचा हात दिला. पण यावेळी स्थिती गंभीर आहे. मृत्यूदर वाढल्याने जो तो भितीग्रस्त आहे. अशा संकटकाळात एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने दिलेल्या प्रोत्साहनाने गावातील विस कुटुंबिंयांना मदतीचा हात मिळाला आहे.
       
        चंद्रपूर जिल्हयात कोरोनान कहर माजविला आहे. जिल्हयात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या  वाढतच आहे. सोबत मृत्यूचा आकडे चिंतेत भर घालीत आहेत. प्रशासनाने यावर आवर घालण्यासाठी पंधरा मे पर्यत लाॅकडाउन लावला आहे. यामुळे रोजीरोटी करणाऱ्यांचे अक्षरश वांदे होत आहेत. मागच्या लाकडाउन मध्ये अनेकजण मदतीसाठी समोर आले होते. पण यावेळेस मात्र कुणी कुणाला मदत करायला तयार नसल्याचे चित्र आहे.
   
         गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये अनील चव्हाण नामक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्याची पत्नी सुप्रिया यांनी गरीबांना मदत करण्याबाबतचा विचार बोलून दाखविला. संकटकाळात गरीब कुटूंबियांची होत असलेल्या वाताहातीबाबत आपणाकडुन थोडीफार मदत व्हायला हवी यासाठी त्यांनी नवऱ्याला प्रोत्साहन दिले. अनं मग काल अनिल चव्हाण यांनी गोंडपिपरीतील विस गरीब कुटुंबियाना मदतीचा हात दिला. तांदुळ, तेल, गहु अनं जिवनाश्यक वस्तूची किट तयार करून ती वितरीत केली. यावेळी पोलीस कर्मचारी अनील चव्हाण यांच्यासोबत त्याच्या पत्नी सुप्रिया चव्हाण यादेखिल उपस्थित होत्या.
      
     दारूबंदीच्या चंद्रपूर जिल्हयात अलीकउे पोलीसांच्या कार्यवाहीप्रती विविध शंका उपस्थित केल्या जातात. अशावेळी एका पोलीसान दाखविलेेल औदार्य महत्वपुर्ण ठरलेल आहे. एका पोलीस कर्मचारी व त्यांच्या पत्नीन दाखविलेल्या या सामाजिक जाणीवेप्रती अनेकांनी कौतूक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत