💻

💻

चंद्रपूरसह इतर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूरसह अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी. पथकाने नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ३६ हजार ७७१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जिशान ऊर्फ जिशू सय्यद रिजवान रिझवी (२०) रा. झेंडा चौक कामठी नागपूर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तर शाहीद अली रज्जा अली हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनअंतर्गत चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी. पथकाने तपास करून नागपूर कामठी येथून जिशानला ताब्यात घेतले.

त्याची सखोल चौकशी केली असता, चंद्रपूर येथे मित्रासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली. यासोबतच वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती येथेसुद्धा चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ३६ हजार रुपये किमतीच्या पाच सोन्याच्या चेन जप्त केल्या. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे सुधाकर अंबोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, लालू यादव आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत