💻

💻

पिपरीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला अटक.

Bhairav Diwase. May 06, 2021
कोरपना:- कोरपना येथून जवळच असलेल्या पिपरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल ऊर्फ प्रफुल चांदेकर यांनी एका महिलेला नाहक त्रास देत असल्याने असह्य झालेल्या महिलेने कोरपना पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत कोरपना पोलिसांनी अनिल चांदेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पोलीस सूत्रांनुसार अनिल ऊर्फ प्रफुल चांदेकर हा पिपरी येथे राहत असून तो तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. पिपरी येथून जवळच असलेल्या एका गावातील महिलेशी त्याची ओळख झाली. तिच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. कधीही रात्र-बेरात्री जाणे, तिला धमकावून अश्लील बोलून शिवीगाळ करणे, असा प्रकार काही दिवसांपासून सुरू होता.

महिला असल्याने आपलीच बदनामी होईल व आपल्या जिवाला धोका होईल म्हणून महिला गप्प होती. तक्रारीच्या एक दिवसाअगोदर तो घरी आला. वाईट नजरेने पाहून अश्लील शब्द वापरून धमकी दिली. घाबरून महिलेने घराबाहेर पडली व सरळ कोरपना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोरपनाचे ठाणेदार अरुण गुरनुले यांनी अनिल चांदेकर यांच्या विरोधात ४५०, ३५४ (ड) (१), २९४, ५०६, ६६ या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद दाखल केला व अनिल याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला राजुरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी त्याची रवानगी चंद्रपूर कारागृहात करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत