Top News

वरोरा नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचे जनतेला आव्हान.


Bhairav Diwase. May 05, 2021
वरोरा:- उद्या दि. 06/05/2021 पासून 18-44 वयोगटाकरिता "Covaxin लस" नगरपरिषद जुनी इमारत, पोस्ट office जवळ,वरोरा येथील सेंटर येथे लसीकरण सत्रास शुभारंभ होत आहे.

ही लस घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने cowin app किंवा आरोग्य सेतु app var नोंदणीकृत करून दिलेल्या तारखेला आणि वेळात च जसे की 9-11,11-1,1-3,3-5 या time slot मध्येच येऊन vaccin घेता येईल नागरिकांना दिलेल्या time slot च्याव्यातिरिक्त येणाऱ्या ना vaccine दिली जाणार नाही. त्यांना दिलेल्या वेळेत यावे लागेल त्यामुळे विनाकारण गर्दी करू नये.

तरी आपल्या संपर्कातील सर्वांना या लसीकरणाच्या लाभ घेण्यासाठी सांगावे असे नम्र आव्हान अहेतेशाम अली, नगराध्यक्ष नगर परिषद वरोरा यांनी जनतेला केले आहे.


💉कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन.....

१. सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. याला एन्टर करून व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.

२. या वेबसाइटवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर आणले जाईल. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर, नाव, जन्म दिनांक, जेंडल आणि अन्य डिटेल्स भरावे लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एसएमएस द्वार सर्व आवश्यक डिटेल्स पाठवले जातील. सर्व डिटेल्स तपासून घ्या. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल. याला सेव करुन ठेवा.

३. तुम्ही या अकाउंटला ३ लोकांसोबत लिंक शेयर करू शकता. यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल्स पेजच्या खाली दिलेल्या ॲड मोअर बटनवर क्लिक करावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स भरली होती. तितकीच तुम्हाला डिटेल्स एन्टर करावी लागेल.

४. आपल्या जवळच्या सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस स्क्रॉल करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला मॅप आणि डायलॉग बॉक्स दिसेल. त्यात तुम्हाला एन्टर प्लेस, अॅड्रेस, लोकेशन इत्यादी डिटेल्स एन्टर करावे लागतील त्यानंतर गो बटनवर टॅप करावे लागेल.

५. अपॉइंटमेंट स्केड्यूल करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जावे लागेल. त्यानंतर स्केड्यूल अपॉइंटमेंट बटनवर क्लिक करू शकता. असे केल्यानंतर तुम्हाला वॅक्सिनेशन पेजवर बुक अपॉइंटमेंट वर पोहोचवले जाईल. या पेजवर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटरचा पर्याय निवडू शकता.

६. ज्यावेळी तुम्ही सेंटरचा पर्याय करता. त्यावेळी तुम्हाला स्लॉट दिसेल. यानुसार, स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज ओपन होईल. सर्व डिटेल्सला चांगल्या प्रकारे चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्या ठरल्या वेळेला लस घ्या.

७. कोविड १९ लस सर्टिफिकेटला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. याशिवाय, Aarogya Setu अॅपवर सुद्धा जाऊ शकता. आरोग्य सेतू अॅपवर गेल्यानंतर कोविन टॅप वर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागेल नंतर Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये नाव, जन्म दिनांक, बेनिफिशियरी रेफरेंन्स आयडी, फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हे सर्व उपलब्ध असेल.

८. CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate वर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा सर्च बटनवर टॅप करून सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने