भारतीय जनता युवा मोर्चा यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- आज दि. 25 मे 2021 रोज मंगलवारला भारतीय जनता युवा मोर्चा बल्लारपूर यांनी भाजयुमो जिल्हाध्यक्ष चंद्रपूर आशिषभाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडेय यांच्या नेतृत्वामध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात कोविड -१९ च्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका ओळखून बल्लारपूरात ग्रामीण रूग्णालयामध्ये बाल रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. कोरोणाची तीसरी सभाव्य लाट येऊन त्याचा धोका प्रामुख्याने लहान मुलांना संभावणार असल्याचे बोलले जात आहे . तसेच मा. मुख्यमंत्री व कृती दलानी सुद्धा तशी भीती व्यक्त केली आहे . त्यामुळे यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून बल्लारपूरातील ग्रामीण रूग्णालयात सर्व सोईसुविधांनी युक्त असे बाल रुग्णालय उभारावे आणि कोविड -१९ सारखी ही भयंकर महामारी बल्लारपूर तालुक्यातील बालकांमध्ये शिरकाव करणार नाही यासाठी पाऊल उचलावा अशी मागणी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.
सोबतच बाल रुग्णांना इन्फ्लुयेंजा इंजेक्शन देने, नगर परिषद द्वारा संचालित वस्ती विभागातील रुग्णालयात बाल रोग तज्ञ यांची नियुक्ती करावी, तसेच बेबी वेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध करण्यात यावी कारण वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोविडचे तिसरे स्तर येण्याआधी संपुर्ण सुविधा परिपूर्ण राहतील.
त्याप्रसंगी युवामोर्चा जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, भाजपा शहर सचिव मनिष रामिल्ला, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख आदित्य शिंगाडे, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख पियुष मेश्राम, विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागडे आदी उपस्थित होते.