Top News

गाेंडपिपरी-बल्हारपुरचे एस डी ओ संजय कुमार डव्हळेनी सहाय्यक महसुल कर्मचारी सुनिल चांदेवारवर कुठलेही सबळ कारण नसतांना खाेटा पोलीस गुन्हा दाखल केला.

चंद्रपूर जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचा आराेप!


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गाेंडपिपरी तथा बल्हारपूरचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांनी कुठलेही सबळ कारण नसतांना गाेंडपिपरी उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक महसुल कर्मचारी सुनिल चांदेवार यांचेवर खाेटा पाेलिस गुन्हा दाखल केला असा आराेप महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना बुधवार दि. ५मे ला एका शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातुन केला आहे .दरम्यान या निवेदनातुन संघटनेने एस.डी.ओ. डव्हळे यांचे बेशिस्त व उर्मट वागणुक पणाचा सविस्तर पाढा वाचला असुन ज्या कर्मचा-यावर अन्याय झाला त्या बाबतीत संघटनेच्या काही पदाधिका-यांनी मंगळवार दि. ४मे ला एस.डीओ. यांची भेट घेवून सदरहु प्रकरणा बाबत सविस्तर चर्चा केली. पदाधिका-यांनी या बाबत सामंजस्यपणे समझाेता करण्यांचा आटाेकाट प्रयत्न देखिल केला पण त्यांना यश आले नाही . शेवटी गाेंडपिपरी -बल्हारपुरचे एस.डी.ओ.डव्हळे यांनी आपली भूमिका ठाम ठेवली .त्यांचे या अश्या हुकुमशाही वागणुकीमुळे महसुल कर्मचा-यात असंताेषाची लाट खदखदत आहे . बल्हारपूर-गाेंडपिपरी एसडीआे पदाचा कार्यभार ते दि.२१-९-२०१९पासुन सांभाळीत असुन त्यांनी सुनिल चांदेकरवर खाेटा पाेलिस गुन्हा दाखल केल्यामुळे विशेषता गाेंडपिपरी व बल्हारपूर कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसुन येते. सदरहु कारवाई बेशिस्त तथा उर्मटपणाच्या वागणुकीतुन केली असल्याचे जिल्हा महसुल विभागातील कर्मचारी वर्गात आता उघड उघड बाेलल्या जात आहे .सुनिल चांदेवार यांचे वरील पाेलिस गुन्हा रद्द करा व एस.डी.ओ संजय कुमार डव्हळे यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी कर्मचारी वर्गांकडुन हाेवू लागली आहे .एकीकडे काेराेना सारख्या महाभयानक संकटात महसुल कर्मचारी जीव धाेक्यात टाकुन दिवस रात्र प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहे.तर दूसरी कडे कर्मचा-यावर विनाकारण अश्या प्रकारच्या कारवाया केल्या जात आहे .त्यामुळे निश्चितचं त्यांचे मनाेबल खचले आहे .तरं चांदेवार यांचेवर विनाकारण कारवाई केल्यामुळे महिला कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गाेंडपिपरी -बल्हारपूरच्या एस.डी.ओ वर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यांचा इशारा जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेने एका पत्रकातुन दिला असुन.आज जिल्ह्याभरातील महसुल कर्मचारी काळ्या फिती लावून एस.डी.ओ. नी केलेल्या कारवाईचा निषेध नाेंदविणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने