Click Here...👇👇👇

जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांचे कडून ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णाला बसण्याकरीता खुर्च्या भेट.

Bhairav Diwase
माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मदत करण्याचे केले होते आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यासंदर्भात माजी अर्थ व नियोजन मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मदत कार्य करण्याचे आव्हान केलेले होते.
त्या अनुषंगाने केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राहुल संतोषवार यांनी ग्रामीण रुग्णालय पोंभुरणा कोविड सेंटरला खुर्च्या भेट दिले.लस घेणाऱ्या नागरिकांना लसीकरण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट निरीक्षण कक्षात आराम करावे लागत असल्याने तिथे बसण्याकरिता खुर्च्या ची कमतरता बघता विश्रांती करिता आसन असावे या दृष्टीने त्यांनी निरीक्षण कक्षात खुर्च्या भेट दिले.
शासन आपल्या स्तरावर उपाययोजना करीत असले तरी काही प्रमाणात उणीव आढळून येत आहेत.एक माणुसकीच्या नात्याने राहुल संतोषवार यांनी माजी अर्थ व नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी मदत कार्य केलेले आहे.