💻

💻

खासदार अशोक नेते यांची पाथरी कोविड केअर सेंटरची पाहणी.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सावली:- तालुक्यातील पाथरी परिसरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या बघता पाथरी येथील पाथरी तालुका संघर्ष कृती समिती तथा ग्रामपंचायत कार्यालय पाथरी यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद हायस्कूल येथे कोवीड सेंटर बनविण्याचा निर्णय घेतला ही बाब चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटी भाऊ भांगडिया यांना सांगताच मा. आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी कोवीड सेंटर येथे 15 बेड ची व्यवस्था करून दिली तथा इतर मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाथरी येथे माननीय तहसीलदार पाटील साहेब यांच्या आदेशानुसार कोवीड सेंटर सुरु करण्यात आले.

आज गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. अशोकजी नेते साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली व ऑक्सिजन कॉनसन्ट्रेट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. गावाच्या विकासासाठी पाथरी येथील उपसरपंच श्री प्रफुल तुम्मे यांनी चर्चा करून गावाच्या विकासासाठी मदत करून लक्ष देण्याची विनंती केली. यावेळी उपस्थित सरपंच सौं अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुल तुम्मे, सदस्य प्रवीण वाघमारे,सौं अल्का वाघधरे, सौं प्रीती लाडे तथा भाजपा सावली तालुका अध्यक्ष श्री अविनाश पालं, महामंत्री दिलीप ठिकरे, पंचायत समिती सदस्य तुकाराम ठिकरे, शरद सोनवाणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत