जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

चोरीच्या खोट्या आरोपामुळे युवकाने केली आत्महत्या.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
आरमोरी:- टिकाराम प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपला पुतण्या नवनाथ लक्ष्मण प्रधान (२५ वर्षे, रा.सायगाव) हा अजय कापकर आरमोरी यांच्याकडे रोजंदारीने कामावर जात होता. १६ मे २०२१ रोज अजय कापकर व त्यांची पत्नी अरुणा, शंकर माकडे रा.सायगाव व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी मिळून नवनाथने १० हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन आरमोरी येथे केली.
 पोलिसांनी पुतण्याला बोलावून तपास केला असता त्याने चोरी केली नसल्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. पुतण्या सायंकाळी घरी सायगावला परत आल्यावर त्याने हा प्रकार काका टीकाराम प्रधान यांना सांगितला. आपण चोरी केली नसून कापकर हे अनधिकृत कामे करण्यास सांगत होते.
दारूबंदी असताना त्यांचा चालक व मजूर व इतरांकरिता दारू आणण्यास सांगत होते. ऐकले नाही तर चोरीच्या आरोपात अडकवू म्हणून दबाव टाकत शिवीगाळ करत असल्याचे नवनाथने आपल्याजवळ सांगितले होते, असे टिकाराम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नवनाथचे त्याच्या आई-वडिलांशी पटत नसल्याने तो आपल्या जुन्या घरी पत्नीसोबत राहात होता. पत्नी माहेरी गेली असल्याने तो सध्या एकटाच राहात होता. कापकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतण्यावर खोटे आरोप लावून त्याला त्रास दिल्यानेच मानसिक तणावात येऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी टिकाराम प्रधान यांनी तक्रारीत केली आहे. यावरून आरमोरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.
तिसरा आरोपी म्हणजेच अरुणा अजय कापकर फरार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भादंवि कलम ३०६, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत