जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेच्या माध्यमातून कोविड लसीकरण जनजागृती अभियान व मास्क वितरण.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सद्याची परिस्तिथी लक्षात घेता कोरनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने अनेकांचे घरे उध्वस्त होताने दिसून आले आहे . कोणाचे वडील तर कोणाचा मुलगा,भाऊ कोणाची आई तर कोनाची मुलगी, बहीण हे गमावलेले आणि कित्येक मुलांच्या डोक्यावरून आई वडिलांचा छायाः गमाऊन बसलेले चित्र या समाजामध्ये दिसून येत आहे. हे सगड चित्र समोर निर्माण होणार नाही व तिसऱ्या लाटेला कश्याप्रकारे आटोक्यात आणता येईल कि ज्यामुऴे परत हे चित्र निर्माण होणार नाही म्हणून व आपण समाजाला काही तरी देणं लागतो या सकारात्मक भावनेतून व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जोपासत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या विचारांच्या पाऊलावर पाऊल ठेवत उमरी पोतदार येथील युवकांनी एकत्र येऊन पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेची बीज रोवून संस्थेच्या वतीने कोविड लसीकरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या कार्याची माहिती मिळताच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी संस्थेला मास्क व कालनिर्णय देऊन एक मोलाचा सहकार्य केले व त्यांच्या या सहकार्याने गावांमध्ये घरोघरी जाऊन संस्थेच्यावतीने मास्क वितरण करण्यात आले.
या अभियानाला यशस्वीरित्या प्रत्यक्षात् घडवून आणनारे संस्थेचे निखिल झबाडे, अंकुश उराडे, निखिल झूरमुरे, चंद्रकांत सिडाम,संदीप यम्पलवार, भीमराव मेश्राम, विक्रम लेनगुरे, नदिम कुंभरे, मनोज उपरे, अविनाश लेनगुरे, मनिष ठाकरे, अमित कुंभरे,अंकुश लेनगुरे, चेतन कावळे, महेश कुलमेथे यांचा मोलचा सहभाग लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत