जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

राज्यातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या अनेक प्रलंबित समस्यांचे निराकरण करा!.


भाजयुमोचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामूळे राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अनेकानेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठीची मूल्यांकन पद्धती, १२ परीक्षाबाबत ची अस्पष्ट भूमिका, परीक्षा शुल्क माफी, शाळा महाविद्यालये फी मध्ये सूट अश्या समस्या अंतर्भूत आहेत. त्यामुळे राज्यसरकारने सदरहू समस्यांच्या निराकरण करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलनून राज्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात.
यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सम्बन्धित मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात नमूद मागण्या पुढीलप्रमाणे :
१) या SSC बोर्ड परीक्षेसाठी अंदाजे १७ लाख विद्यार्थी बसणार होते आणि त्यांच्याकडून प्रत्येकी अंदाजे रु.४१५/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आली, या माध्यमातून एकत्रितपणे अंदाजे ६८ कोटींपेक्षा जास्त रक्कम राज्यसरकारकडे परीक्षा शुल्कापोटी जमा झाली आहे. जर सरकार परीक्षा घेणार नाही तर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क का परत केले जात नाही ?
विद्यार्थ्यांच्या या पैशामध्ये तरी सरकारने पारदर्शकता ठेवावी व सदर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरीत परत करावे.

२)१०वी SSC परीक्षा रद्द केल्यावर आता ११वी ची प्रवेशप्रक्रीया कोणत्या निकषांच्या आधारे केली जाणार आहे या बाबतची स्पष्टता अजूनही राज्यसरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.
सदर विषयात सरकारने आता वेळ न दवडता भूमीका त्वरीत स्पष्ट करावी.

३. महाराष्ट्रातील सर्वच विद्यालये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुक्ल विद्यापीठांकडून विनाशर्त माफ करण्यात यावे.
४. सद्या महाविद्यालयांकडून साधारणपणे २० वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत, परंतु महाविद्यालयातील वाचनालय, प्रॅक्टिकल लॅब, कम्प्युटर लॅब, वास्तू, मैदान, वर्गखोल्या, या सर्वांसाठी लागणारी वीज या सर्व गोष्टींचा वापर होत नसल्याने शाळा/महाविद्यालयांनी केवळ ट्युशन फी आकारावी आणि अन्य सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे.
असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या आपल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने द्यावेत.

५. जे विद्यार्थी कोविड-१९ मुळे थेट प्रभावित झालेले आहेत, त्यांची फी महाविद्यालयातर्फे माफ करण्यात यावी, अथवा सरकारने हस्तक्षेप करून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांची फी भरावी.

६. फी भरण्याची स्थीती नसलेल्या विद्यार्थ्यांना फी टप्प्या टप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी.

७. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे.
८. विद्यार्थ्याचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण ते शिकत असलेल्या शाळा/महाविद्यालयातचं करून घेण्याची यंत्रणा सरकारने उभारावी.

या सबंध मागण्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने आम्ही युवा मोर्चा म्हणून या सर्व महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आग्रही आहोत. त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून पत्रात अंतर्भूत असलेल्या रास्त मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. अन्यथा राज्य सरकारने या मागण्या पूर्ण न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येईल. अशी भूमिका यावेळी युवा मोर्चाने व्यक्त केली.
याप्रसंगी, भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संयोजक प्रतीक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत