Top News

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला.

राज्यात 5 टप्प्यात शिथिलता देणार. ना. विजय वडेट्टीवार यांची माहिती.
Bhairav Diwase. June 03, 2021
मुंबई:- मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच मुंबई लोकलबाबतच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा – जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के पेक्षा कमी बेड व्यापलेले आहेत, तिथं लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही, पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
विजय वड्डेटीवार नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
काय सुरु राहणार?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस 100 टक्के क्षमतेने, इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.
अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे

तिसरा 10 जिल्हे

चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे
लेवल एकमध्ये येणारे जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.
मुंबई दुस-या लेव्हलमध्ये

मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल
उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार

दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पाच लेव्हल कशा आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने