Top News

दिलासादायक; 24 तासात 342 कोरोनामुक्त, 177 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू.

चंद्रपूरकरांसाठी खुशखबर; 4 जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यात अनलॉक, सर्व व्यवहार होणार सुरळीत सुरू.
👇👇👇👇👇👇👇👇

Bhairav Diwase. June 03, 2021
चंद्रपूर:- 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
आज एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 813 झाली आहे. सध्या 1 हजार 945 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 79 हजार 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 93 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1470 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1361, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने