Top News

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते कृषी दिनाचे औचित्य साधून अनेक शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. #Agriculture


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
                                   
     वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने' तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो.
                               
      त्याच निमित्याने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने अनेक शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी सन्मान सोहळा आज कन्नमवार सभागृहात पार पडला.   
     त्यामध्ये श्री. गुरुदास मसराम पांढरवाणी, श्री. दिनेश शेंडे मेंढा, श्री. देवराव शेडमाके डोंगरगाव, श्री. सुरेश गरमडे वायगाव, श्री. प्रकाश कामडी बोडखा, श्री. बबन खिरतकर मोखाळा, श्री. बालाजी पिसे कुर्ला, श्री. वासुदेव श्रीरामे पिंपळगाव, श्री. पतरुजी श्रीरामे टेकाडी, श्री. मनोहर वाकडे परसोडा, श्री. पुरुषोत्तम वाकडे वडकुली, श्री. संजय शेंडे तारसा, श्री. एकनाथ हेपटे चक बल्लारपूर, श्री. साईनाथ मडावी डोंगरगाव, श्री. सुखदेव राऊत ढोरखा, श्री. रामचंद्र कुळमेथे आसन, श्री. यशवंत साथरे संधा कांचणी, श्री. बालाजी धोबे संधा कांचणी या शेतकऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी उपस्थित सौ.रेखा कारेकर उपाध्यक्षा, श्री. सुनील उरकुडे कृषी सभापती, श्री. राजू गायकवाड बांधकाम सभापती, श्री. नागराज गेडाम समाज कल्याण सभापती, सौ. रोशनी खान महिला व बाल कल्याण सभापती, सौ. जोती वाकडे सदस्या, श्री राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. श्याम वाखर्डे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. भाऊसाहेब बरहाटे जिल्हा कृषी अधिकारी, श्री. चंद्रकांत गुप्ते संचालक दिनी केमिकल्स, डॉ. अनिल कोल्हे झार्स सिंदेवाही, श्री. रवींद्र मनोहरे उपसंचालक जिल्हा कृषी अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

#chandrapur #Chandrapurnews #Agriculture

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने