कृषी संजीवनी मोहीमद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. नाईक यांची कामगिरी लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांच्या जंयतीनिमित्त राज्यात दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील शेतकरी समुद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे स्वप्न वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. कृषी क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती राजुरा येथे कृषी संजिवनी सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राजुरा तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा उत्पादक पीक स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्याचा सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, पंचायत समिती सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरूनुले, जि. प. सदस्या मेघाताई नलगे, प. स सदस्य तुकाराम मनुसमरे, उपविभागीय कृषि अधिकारी जी. डी. मोरे, गटविकास अधिकारी, डॉ. ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी व्ही. के मकपल्ले, कृषी अधिकारी डाखरे, कृषि विस्तार अधिकारी पोहोकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. #KrishiSanjivani