Top News

मुल तालुक्यातील पंचायत समितीचे राजकारण तापले. #Politics

राजकीय विरोधकांनी रचले बनावट पञाचे षडयंञ; मारगोनवार यांची चौकशीची मागणी.
मुल:- राजकिय क्षेत्रातील विरोधकांनी सुखदेवे यांना हाताशी धरून बनावट लेटर पॅडद्वारे आपल्या विरूध्द षडयंत्र रचला असून भविष्यात विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामूळे पोलीसांनी बनावट पत्राची सखोल चौकशी करावी. अशी मागणी पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे उपस्थितीत सभापती कक्षात आयोजीत कक्षात बोलतांना सभापती चंदु मारगोनवार यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला परंतु धमकी दाखविण्याचा पत्रव्यवहार आजपर्यंत कधीच केलेला नाही, असे सांगतांना काॅम्प्युटर आँपरेटरच्या सहकार्याने सभापतीचे लेटर पॅड आणि स्वाक्षरी स्कॅन करून राजकिय विरोधकांनी पत्र पाठविले असून पाठविलेले पत्र आणि स्वाक्षरीची फाॅरेन्सीक लॅब मध्ये तपासणी करून प्रकरणाचा छळा लावावा. अशी तक्रार पोलीसात नोंदविल्याचे त्यांनी सांगीतले.
   बनावट पत्र तयार करून बदनामी करण्याच्या प्रकरणात सचिव सुखदेवे मुख्य आरोपी असून सदर प्रकरणात सहकार्य करणारे कोण आहेत, याची माहिती आपल्याला मिळाली असून त्यांची नांवे पोलीसांना सांगणार असल्याचे मारगोनवार यांनी स्पष्ट केले. सरपंच आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याने ग्राम पंचायत सदस्य नाराज होते. आपल्या नेतृत्वात ग्राम पंचायत निवडणुक लढविल्यानंतर सरपंचासह पंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली. त्यामूळे सदस्यांना विश्वासात घेवून पंचायतीचे कामकाज करा. असा सल्ला आपण तत्कालीन सरपंच यांना अनेकदा दिला. परंतू त्यांनी आपले काही एक न ऐकता ग्राम विस्तार अधिकारी सुखदेवे यांच्याशी संधान साधुन कामकाज सुरूच ठेवला.
 परिणामी ग्राम पंचायत सदस्यांची नाराजी दुर करण्यासाठी नाईलाजास्तव आपल्याच पक्षाच्या सरपंचावर अविश्वास आणावा लागला. असे सांगतांना मारगोनवार यांनी शासनाने विकास कामे करण्यासाठी १० लाख किंम्मतीच्या खालील कामे करण्यासाठी आँफलाईन निवीदा पध्दत सुरू केली त्यामूळे त्या नियमाचे पालन करून कामे करावी. असा सरपंच व सचिव यांना आपण सल्ला दिला. परंतू त्या दोघांनीही आपले म्हणणे न ऐकता आँफलाईन निवीदे संदर्भातील शासन निर्णयाचे उल्लंघन करून पंचायत मध्यें मनमानी कारभार चालविला. ८ लाख आणि २.६४ लाख किंम्मतीच्या दोन्ही कामात सरपंच आणि सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याने पंचायतीचे सदस्य नाराज होते.
     
       नाराज सदस्यांच्या बहुमताने सरपंचा पायउतार झाली. परंतू सचिव सेवारत असल्याने सचिव सुखदेवे यांना नियमाबाहय काम करीत असल्याचं कारणावरून निलंबीत करावे. अशी मागणी करणार असल्याचे सांगतांना मारगोनवार यांनी आपल्या नावाने केलेल्या पत्रव्यवहाराविषयी अनेक शंका व्यक्त केल्या.
     
      यावेळी माजी सभापती तथा पं.स.सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, न.प.उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न. प. सभापती प्रशांत समर्थ, पं.स. माजी उपसभापती अमोल चुदरी, सरपंच संजय येनुरकर, बंडु नरमलवार, उपसरपंच मुन्ना कोटगले, राजु पोटे, दिलीप पाल आदि उपस्थित होते.

#Politics #mul #mulnews #chandrapurnews #chandrapur

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने