निंबाळा गट ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापले. #Electricity

Bhairav Diwase
गावकरी पिण्याचे पाण्यापासुन वंचीत.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील कळमणा ग्राम पंचायत अंतर्गत ग्रामपंचायत निंबाळा येथील पाणी पुरवठा योजनेचा विदयुत पुरवठा खंडीत केल्यामुळे गावक-यांना आज पाणीपुरवठा होवु शकला नाही. त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. विदयुत विभागाचे थकीत बिल ग्रामपंचायत ने न भरल्यामुळे महावितरण विभागाने गावाचा विदयुत पुरवठा दिनांक 29/06/2021 रोजी खंडीत केला. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर काँग्रेस ची सत्ता आहे.
निंबाळा गट ग्रामपंचायतीचा कारभार कळमणा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत या गावाची सत्ता काँग्रेस पक्षाकडे येवुन श्री. नंदकिशोर वाढई हे सरपंच पदावर आरुढ झाले. निंबाळा येथे पाणीपुरवठयाच्या थकीत बिलाची कल्पना ग्रामपंचायत सदस्याकडुन वारंवार सुचना देवुनही विदयुत विभागाचे थकीत बिल भरण्यास सरंपच कळमणा यांनी हयगय केल्याने दिनांक 29/06/2021 रोजी विदयुत विभागाच्या कर्मचा-यांनी विजेचा पुरवठा खंडीत केला. या प्रकारामुळे दिनांक 30/06/2021 रोजी संपुर्ण निंबाळा गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होवु शकला नाही.
वरील बाब अत्यंत चिंताजनक व खेदजनक असुन सत्ताधारी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यापासुन वंचीत राहावे लागत आहे. त्यामुळे संपुर्ण निंबाळा ग्रामवासीयांमध्ये ग्रामपंचायतीबाबत रोष व्यक्त होत आहे.  #Electricity