बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा कोसळला बुरुज. #Ballarpur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज संततधार पावसामुळे कोसळला आहे. किल्ल्याच्या उत्तर-पूर्व दिशेकडील गोविंदबाबा मंदिर कडील असलेला दुसऱ्या बुरुजाचा काही भाग मागील 2 दिवसात झालेल्या पावसामुळे काल रात्री 10:30 ते 11:00 वाजताच्या दरम्यान कोसळला. #Ballarpur 
किल्ल्याचा हा भाग या लगत वास्तव्यास असलेले श्री दादाजी पाटील यांच्या वॉल कंपाऊंड वर कोसळल्याने खचले आहे. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नाही, मात्र या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्याच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किल्ल्याच्या बाजुला नागरी वस्ती असल्याने या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे त्याचबरोबर हा किल्ला पुरातन वास्तु असल्याने त्याचे जतन होणे गरजेचे आहे.पुरातन वास्तु हा समाजाचा बहुमोल ठेवा पुढील पिढ्याना प्रेरणा देणारा आहे, त्यासाठी त्याचे मजबुतीकरण व सौंदर्य वाढविण्यासाठी स्थानीक प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी दुर्ग संवर्धन समिती कडे याचा प्रस्ताव सादर करावा अशी मागणी दुर्गप्रेमी नागरिकांकडुन होत आहे.