दुचाकीवरील नियंत्रण सुटले; अपघातात एक ठार. #Accident

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी जवळ दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २७ सप्टेंबर ला रात्रौ. ७ वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव अंकुश सुरेश मोरे रा. नवेगाव मोरे वय. ३२ वर्षे असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, सदर व्यक्ती MH 34 N 5924 या दुचाकीने चंद्रपूरवरुन मोहाळा येथे जात असताना चेक खापरी जवळ दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अंकुश रोडच्या कडेला कोसळला. या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
पुढील तपास पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जोशी यांच्या मार्गदर्शनात पो. उ. नि. दादाजी ओल्लालवार करीत आहे.