Top News

विदर्भ माध्यमीक शिक्षक संघाचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न. #Pombhurna

शिक्षकांच्या विविध समस्यांवर झाली चर्चा.
पोंभूर्णा:- विदर्भ माध्यमीक शिक्षक संघ चंद्रपुर तथा विमाशि संघ तालुका पोंभूर्णा च्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक मेळावा जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पोंभूर्णा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमरसिंह बघेल होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विमाशि संघाचे प्रांतीय सरकार्यवाहक सुधाकर अडबाले, तर प्रमुख अतिथी म्हणून विमाशि संघाचे मुंबई सहकार्यवाहक जगदीश जुनघरी, मराशि शिक्षक संघ चंद्रपुर कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, मराशि संघ चंद्रपुर चे अध्यक्ष केशव ठाकरे, चंद्रपुर चे सरकार्यवाहक श्रीहरी शेंडे, उपाध्यक्ष सुनिल शेरकी, जिल्हा सल्लागार टोंगे, माजी मुख्याध्यापक पांडुरंग पिंपळकर, साईकृपा विद्यालय चिंतलधाबा चे मुख्याध्यापक विकास येलेट्टीवार, राष्ट्रमाता विद्यालय देवाडा चे मुख्याध्यापक भास्कर मेश्राम, जनसेवा विद्यालय दिघोरी चे मुख्याध्यापक मनोज अहिरकर, घाटकुळ चे मुख्याध्यापक प्रफुल्ल निमसरकार, माजी मुख्याध्यापक बुरांडे, इत्यादीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नोव्हेंबर २०२२ विधान परिषद शिक्षक उमेदवार, जुनी पेन्शन योजना, प्रचलित नितीनुसार अनुदान, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी, प्रलंबित महागाई भत्ता, वेतनोत्तर अनुदान, अंशता अनुदानित शिक्षकांचे समायोजन, याबाबत चर्चा करण्यात येवून विमाशि संघाद्वारे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याकरीता महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात पाठवणे काळाची गरज असल्याचे एकमत करून आत्तापासूनच त्या अनुषंगाने रणनीती आखूण अंमलबजावणी करण्याचे धोरण आखण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल माथनकर, आभार प्रदर्शन सुरेंद्र एलीचपुरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवानंद रामटेके, नरेंद्र दुधबावरे, योगेश पेंटेवार, वसंत भोयर, रवि कामीडवार, राजू वाढई, महेंद्र वनकर, इत्यादींनी सहकार्य केले. मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने