Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

शेणगाव ते भेंडवी पर्यंतच्या रस्त्यांच काम जलद गतीने करा; सुनिल राठोड यांची मागणी.#jiwati(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळखला जानार्या जिवती तालुक्यातील रस्त्यांकडे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोक प्रतिनीधीनी तातडीने लक्ष घालुन रस्त्यांच्या कामाला जलद गतीने पुर्ण करावे असे आव्हाण आम आदमी पक्षाचे जिवती तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ राठोड व सामाजिक कार्यकर्ता मा. अरविंद भाऊ चव्हाण यांनी केले आहे.
 झोपेचा सोंग करत असलेल्या सरकारला या रस्त्याबद्धल वेळोवेळी सांगुन सुद्धा याकडे दुर्लक्ष करित आहे रस्त्यावरुन जाताना रस्ता आहेत की गड्डा हेच समजत नाही आणि अस्या रस्त्यांचे गड्डे बुजवायला डस्ट मातीच वापर करुन गड्डे बुजवतात याच परिनाम आम्हा ये-जा करणाऱ्या प्रवासीना भोगावा लागतोय समोर जानार्या गाडी सुद्धा दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात डस्ट उडतात जिवमुठ्ठीत घेऊन प्रवास करावा लागतोय इतकी बिकट परिस्थिती असुन सुद्धा लोकप्रतिनीधी या कडे लक्ष देत नाही जर या शेणगाव ते भेंडवी पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाला जलद गतीने पुर्ण केले नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने रस्ता खोदो आदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पक्षाचे जिवती तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ राठोड व अरविंदभाऊ चव्हाण यांनी आमच्या प्रतिनीधीच्या माध्यमातून केली आहे.#jiwati

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत