Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

एक प्रयत्न उमेद चा.... #Nagbhid

ग्रामीण होतकरू स्वयंसहायता समूहातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा....


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागभीड:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती नागभीड झेप व लक्ष प्रभाग संघ द्वारा संचालित राणी हिराई रुरल मार्ट व दिवाळी फराळ व इतर साहित्य विक्री प्रदर्शन महोत्सव 2021 चे उद्घाटन आज थाटामाटात पार पडले


आज दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोज गुरुवारला माननीय प्रफुल भाऊ खापर्डे सभापती पंचायत समिती नागभीड यांच्या शुभहस्ते माननीय सौ रागिणी ताई गुरपुडे उपसभापती, मा श्री संजय जी गजपुरे जी.प. सदस्य, मा. श्री खोजरामजी मरसकोल्हे जी.प. सदस्य, मा. सौ. नैनाताई गेडाम जी.प. सदस्य, श्री शामसुंदर पुरकाम प.स., मा. सौ. सुषमा ताई खामदेवे प.स., मा. श्री संतोष भाऊ रडके प.स. सदस्य, प्रभाग संघाचे सौ.अनिता बांबोडे, सौ.अनिता बावनकर, सौ.सुषमा डोर्लीकर ,सौ. शारदा बोरकर, शसौ.शिकला भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्तीतीत व मा. सौ प्रणाली खोचरे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे उदघाटन सोहळा पार पाडण्यात आला.


सदर महोत्सवांमध्ये तालुका अंतर्गत स्वयंसहायता समूह यांचे 25 स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्या स्टॉलवर दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या महोत्सवामध्ये वीविध प्रकारची दिवे, फराळाचे साहित्य, हस्तशिल्प, कलाकुसरीच्या वस्तू, मशरूम, देवीच्या मुर्त्या, सेंद्रिय भाजीपाला, विविध प्रकारचा सेंद्रिय तांदूळ व इतर साहित्य उपलब्ध केलेला आहे. सदर महोत्सवाला नागभिडकर जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्या अंतर्गत काम करणाऱ्या पशु सखींना पशु सखी किट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या किट च्या मदतीने गाव स्तरावरील पशुपालकांना उत्तम दर्जाचे सेवा देण्यात येईल व पशु चा मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
या सोहळ्याला माननीय श्री बंटी भाऊ भांगडिया आमदार साहेब हे सुद्धा उपस्थित झाले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण स्टॉलवर खरेदी करीत महिलांशी संवाद साधला व सर्व महिलांना त्यांच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा दिल्या उपजीविका वृद्धीसाठी तालुका अंतर्गत मोठे प्रोजेक्ट आणण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सर्वांनी सदर मोहोत्सवाची प्रचार प्रसिद्धी करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री मोहित नैताम तालुका अभियान व्यवस्थापक, अमीर खान ता.व्य., अमोल मोडक ता.व्य., ज्योती साळवे प्र.स, दीपक गायकवाड प्र.स.,शुभम देशमुख प्र.स, गजानन गोहने प्र.स, इंद्रजित टेकाम, अमोल जीवतोडे, निकेश हजारे,नंदकिशोर डाहारे, किशोर मेश्राम, जगदीश हजारे, शालू खोब्रागडे, सुनील निहाते, दर्शना समर्थ,शरद मसराम तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष पंचायत समिती नागभीड यांच्या वतीने करण्यात आहे.#Nagbhid

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत