बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू. #Chandrapur #Gadchiroli #Tigerattack

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
सिरोंचा:- तालुक्यातील पेंटीपाका येथील जंगल परिसरात आज सकाळी जंगलात शेळी चारायला गेलेल्या मलय्या बालय्या दुर्गम (वय 48)वर बिबट्याने अचानक हल्ला करून जागीच ठार केले.

त्याला मारून 100 मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्यावर तिथेच सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे धाव घेतली पण दुसरी व्यक्ती जोरा लजोरात आवाज करत पळून आली.

या घटनेची माहिती गावातील लोकांनी वनविभाग, पोलीस स्टेशन सिरोंचा यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मोका पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यास ग्रामीण रुग्णालयात सिरोंचा येथे पाठविण्यात आला.

यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू यांनी मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली. यावेळी क्षेत्र सहाय्यक सिरोंचा आर. व्ही. जवाजी, वनरक्षक डी. जी. बुरसे,आत्राम,एस.टी. तुलावी, पोलिस उपनिरीक्षक किशन कांदे, संतोष कांबळे, प्रवीण तोर्रेम व सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला,पोलीस पाटील सडवली वेमुला,पानेम मलय्या,आर.वेदांतम,मधुसूदन आरवेल्ली व गावातील 100-150 गावकरी उपस्थित होते.