पोंभूर्णा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला दहा लोकांसह चार गुरांना चावा. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा शहरात भितीचे वातावरण.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने दहा लोकांसह चार गुरांना चावा घेतला असून यातील एका व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले आहे.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या हद्दीत त्वचेचा आजार असलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी दहा लोकांना चावा घेतला असून सोबतच त्यांने चार गुरांनाही चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे.कुत्र्याची दहशत एवढी आहे की गावातील नागरिक संध्याकाळनंतर हातात काठी घेऊन बाहेर पडत आहेत.
कुत्र्याने चावा घेतलेल्या दहाही जणांना पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांना रॅबिज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले आहे. यातील एका व्यक्तीच्या हाता-पायाला ठिक ठिकाणी चावा घेतला असल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
सदर पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतनी तात्काळ उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी पोंभूर्णा वासियांनी केली आहे.