Top News

विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत राजुऱ्याच्या करण जुनघरी यांची निवड. #Selection


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- विदर्भ हौशी असोसिएशन द्वारा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विदर्भस्तरीय निवड चाचणीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या विदर्भ महालीग कब्बडी स्पर्धेत विविध जिल्ह्यातील १९ खेळाडूंची निवड करण्यात आली असून यात राजुरा तालुक्यातून गोवरी येथील करण हरिश्चंद्र जुनघरी (२०) याची मातोश्री नेर, यवतमाळ पुरुष संघात एकमेव निवड करण्यात आली आहे.
करण जुनघरी हा गोवरी चे प्रतिष्ठित नागरिक हरिश्चंद्र जुनघरी यांचा मुलगा असून तो शालेय वयापासूनच खेळात उत्तम कामगिरी करीत आला आहे. त्याच्या या निवडीबद्दल करणचे आई वडील, मार्गदर्शक सत्यवान कुळसंगे, रमेश लोहे, संजय जुनघरी, दिलीप जुनघरी, श्रीधर जुनघरी, प्रमोद लांडे, प्रकाश काळे, ग्राम पंचायत चेतन गोंडे, पिंपळकर, शंकर मादनेलवार, शुभम श्रीनू जुनघरी, भूषण जुनघरी, केतन बोभाटे, कुणाल जुनघरी व गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने