(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपुर:- राज्यात ऐकीकडे दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे हवादील शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यभरात अतिवृष्टीचा फटाका बसला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिपावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामधून कसे बाहेर पडावे हा प्रश्न शेतकाऱ्यांसमोर आहे.
विदर्भातील चंद्रपूरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील 2 शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटननंतर चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैभव अरुण फरकडे या 25 वर्षीय शेतकऱ्यांने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा शेतकरी गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथील रहिवासी होता.
महेश भास्कर मारकवार वय 34 असे दुसऱ्या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन लक्ष्मीपूजनच्या आयुष्याचा शेवट केला. चेक पिपरी येथील हा शेतकरी होता.
सोयाबीनच्या ढिगाला लागली आग....
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथील रहिवासी बंडू रामटेके शेतातील सोयाबीनच्या ढिगाला आग लागल्याने या शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाली.